सगळ्यांच्या files चेक
करून झाल्यावर मग आमची write-ups लिहण्याची तयारी सुरु व्हायची... सोमनाथ बनकर write-ups गोळा करून आणण्याचे काम करायचा...
मग सगळे 'मातोश्री' वर जमा व्हायचे... महेश यादव आणि सोहन गुणे कुठून तरी प्रिंटरची
व्यवस्था करायचे... रवींद्र सिनारे कडे printout pages, 'बाबा'चा फोटो असलेले write-up
pages, files आणि index pages गोळा करण्याची जबाबदारी असायची...
रात्री जेवण झाल्यावर
१० वाजता सगळे मातोश्रीमध्ये बसायचे... ते write-up चे कागद सगळ्या रूम मध्ये अस्ताव्यस्त
पसरायचे... कोण कुठल्या विषयाचे, कशाचे write-up लिहितोय पत्ता नसायचा... आणि सचिन
शिंदे च्या फोनवर ' लव गुरु ' बडबडत असायचा..
एखादे write-up १० पानांचे
असेल तर 'बन्न्या' त्याला ७ पानांत उरकायचा आणि तेहि दोन शब्दांमध्ये एक बोट अंतर सोडून...
मी ते ५ पानांत गुंडालायचो
आणि 'बारक्या' तर फक्त ३ च पाने file ला जोडायचा...
'बाब्या' हा ग्रुप मधला
सगळ्यात बिंधास्त माणूस… साल्याचे write-ups आम्ही लिहायचो… प्रिंट्स आम्ही काढायचो
आणि हा बोंबलत हिंडायचा...
दुसरी रात्र प्रिंट्स
काढण्यासाठी आरक्षित असायची... ग्रुप मध्ये आम्ही १० जण, त्यामुळे एकाच प्रोग्राम च्या
१० प्रिंट्स काढाव्या लागायच्या... स्वप्नील रायफले आणि मी प्रिंट्स काढायला बसायचो..
मी प्रिंट द्यायला तर स्वप्न्या पेपर लावायला... रात्रभर प्रिंटरची कुर-कुर सुरु असायची...
प्रिंटर वर काम करणाऱ्यांची शिफ्ट दर २ तासांनी बदलायची... आणि शेवटी 'मोत्या' सगळ्यांना त्यांच्या- त्यांच्या प्रिंट्स
वाटून द्यायचा...
दोन दिवसांच्या 'अथक'
मेहनतीनंतर खरी मजा यायची ती file चेक करताना... १० जण पन्हाळकर madam च्या समोर चेहरे
पाडून रांगेत उभे राहायचे... साले मलाच पुढे उभे करायचे… माझ्या file मध्ये काही चूक असली आणि madam नी मला हाकलले कि
मागचे सगळे 'आपो-आप' गायब व्हायचे... कारण सगळ्यांनी एकच write-up छापलेले असायचे...
कधी कधी तर कहर व्हायचा.. दहाही जणांच्या प्रोग्राम च्या description मध्ये एकाचेच
नाव असायचे...:)
No comments:
Post a Comment