बोलता- बोलता तो तिचा
हात हातात घेऊन
म्हणाला, "किती काल
टिकेल तुझे हे
सौंदर्य?"
ती म्हणाली, "ते तर
क्षण-भंगुर आहे".
त्याने परत प्रश्न
केला,"किती काल
टिकेल तुझा हा
गोड स्वभाव?"
ती म्हणाली, "हृदयात श्वास असेपर्यंत
......"
मग परत त्याचा
प्रश्न, "तर मग
सांग मी कशावर
प्रेम करावं ? तुझ्या
सौंदर्यावर कि तुझ्या
स्वभावावर ? "
आता मात्र ती उनुत्तरीत
झाली,
पण तिच्या डोळ्यातील चमक
त्याला बरेच काही
सांगून गेली....
No comments:
Post a Comment