आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....
त्याच त्याच अलंकारिक भाषेला
लोक आता कंटाळलेत,
तेच तेच वाचून
आता तेही वैतागलेत,
अशातच मी माझी
कथा त्यांच्या समोर
मांडतोय,
आणि लोक म्हणतात
तू खूप छान
लिहितोय....
दुष्काळाने
मनाला पडलेल्या भेगा
कागदावर मी मांडतोय,
डोळ्यातही आता रडण्यासाठी
पाणी शिल्लक नाहीये,
यातच मी आशेचे
दोन-चार साडे
या भेगांवर शिंपडतोय,
आणि लोक म्हणतात
तू खूप छान
लिहितोय....
घरूनही येणारा मदतीचा झराया
दुष्काळाने आटलाय,
जगण्याची तारेवरची कसरत करण्यासाठी
मी नवा डाव
थाटलाय,
पण डोळ्यासमोर पाण्यासाठी हंडे
घेऊन उभी असलेली
आई मी पाहतोय,
उजाड माळरानावरील ढेकलाकडे एक
टक पाहणारा बाप
मला दिसतोय,
आणि लोक म्हणतात
तू खूप छान
लिहितोय....
अभ्यास सोडून रस्ता आता
जनावरांच्या छावणीकडे वळतोय,
शिक्षणाच्या
विचाराने छावानिताला एकटेपणा मला
छळतोय,
आटले असेल पाणी
पण हिम्मतीचा झरा
अजून वाहतोय,
आणि लोक म्हणतात
तू खूप छान
लिहितोय....
No comments:
Post a Comment