Wednesday, 18 December 2013

आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

त्याच त्याच अलंकारिक भाषेला लोक आता कंटाळलेत,
तेच तेच वाचून आता तेही वैतागलेत,
अशातच मी माझी कथा त्यांच्या समोर मांडतोय,
आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

दुष्काळाने मनाला पडलेल्या भेगा कागदावर मी मांडतोय,
डोळ्यातही आता रडण्यासाठी पाणी शिल्लक नाहीये,
यातच मी आशेचे दोन-चार साडे या भेगांवर शिंपडतोय,
आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

घरूनही येणारा मदतीचा झराया दुष्काळाने आटलाय,
जगण्याची तारेवरची कसरत करण्यासाठी मी नवा डाव थाटलाय,
पण डोळ्यासमोर पाण्यासाठी हंडे घेऊन उभी असलेली आई मी पाहतोय,
उजाड माळरानावरील ढेकलाकडे एक टक पाहणारा बाप मला दिसतोय,
आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

अभ्यास सोडून रस्ता आता जनावरांच्या छावणीकडे वळतोय,
शिक्षणाच्या विचाराने छावानिताला एकटेपणा मला छळतोय,
आटले असेल पाणी पण हिम्मतीचा झरा अजून वाहतोय,

आणि लोक म्हणतात तू खूप छान लिहितोय....

Wednesday, 13 November 2013

स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

सोडून गेलीस तेंव्हा विचार केला नाहीस,
आणि आता हळूच जखमेवर फुंकर घालतेस....
स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

तुझ्या आठवणी जाळण्याचा प्रयत्न मी करतोय,
आणि तू काळाच्या खिडकीतून डोकावतेस....
स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

वेड्यासारखा रानो-रानी उन्हा- तान्हात भटकतोय,
आणि तू ढग होऊन माझ्यावर सावली धरतेस.....
स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

राहू शकत नाहीस माझ्या विना,
विसरू शकत नाहीस मला,
तर दूर गेलीसच कशाला?
दूर जाऊन जगण्याचा केविलवाणा प्रयत्न का करतेस?

स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

Thursday, 24 October 2013

आश्चर्याचा धक्का....!

आठ दिवस झाले, एक मुलगी मला रोज बस मध्ये दिसत होती (दिसत होती म्हणजे योगा- योगाने आम्ही रोज एकाच बस मध्ये येत होतो). आज मी बस मध्ये चढल्यावर सर्वप्रथम  इकडे-तिकडे पहिले. (का? ते तुम्ही चांगलेच जाणता). पण आज ती काही दिसली नाही. (मन जर बेचैन झाले). तसाच उदास मनाने बस मधल्या गर्दीतून वाट काढत पुढे चालत राहिलो. आणि काय आश्चर्य डाव्या रांगेच्या पुढच्या सीटवर मला ती नजरेस पडली....

'आश्चर्याचा सुखद धक्का बसणे' या वाक्य प्रचाराचा शाळेत मास्तराने डोके आपटून सांगितलेला खरा अर्थ मला आत्ता कळाला......

Monday, 21 October 2013

सौंदर्य आणि स्वभाव...

बोलता- बोलता तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, "किती काल टिकेल तुझे हे सौंदर्य?"
ती म्हणाली, "ते तर क्षण-भंगुर आहे".
त्याने परत प्रश्न केला,"किती काल टिकेल तुझा हा गोड स्वभाव?"
ती म्हणाली, "हृदयात श्वास असेपर्यंत ......"
मग परत त्याचा प्रश्न, "तर मग सांग मी कशावर प्रेम करावं ? तुझ्या सौंदर्यावर कि तुझ्या स्वभावावर ? "
आता मात्र ती उनुत्तरीत झाली,

पण तिच्या डोळ्यातील चमक त्याला बरेच काही सांगून गेली....

लोणी….

अशी कोणती जागा आहे या भूतलावर, कि जिथे वादळे देखील यायला घाबरतात, भूकंपाचा देखील थरकाप उडतो.....
जिचे नाव घेतले कि थंडीलाही हुडहुडी भरते.
पाऊस देखील पडण्याच्या अगोदर दहा वेळा विचार करतो आणि उन्हाचे देखील डोके तापते.......
.
.
.
.
Only PRAVARA ENGINEERS can answer this......
.
लोणी….:)
.
.
.
.....
लोणी ....

आम्ही भारतीय….

या जगात नेहमी सर्वात प्रगत कोण? सर्वात सामर्थ्यवान कोण? आर्थिक विकास, तंत्रज्ञान, शिस्त, सुसंस्कृतपणा याबाबत पहिले कोण? अशाच स्पर्धा का असतात देव जाणे......
.
.
.
कधीतरी सर्वात बेशिस्त लोक कुठले, गरीब, भ्रष्टाचारी, कोण ? सर्वात कुपोषित बालके कुठे आहेत? असंस्कृत, आळशी लोक कुठले अशाही स्पर्धा लावत जा जरा......
.
.
.
बघा " आम्ही भारतीय " पहिले येतो कि नाही ते.....

Thursday, 10 October 2013

तो आणि ती...



                                                    तो आणि ती...

ती  माझी  छोट्या  छोट्या  गोष्टींवरून  मजा  उडवत  होती,
पण  मी  मात्र  शांत  होतो,
का?
मी  उत्तर  देऊ  शकत  नव्हतो ?
तर  नाही.....
मी  उत्तर  देऊ  शकत  होतो,  पण  मला  ते  द्यायचे  नव्हते.....
मला तर  तिला  फक्त  हसताना  पहायचे  होते,

मग  भले  ते  माझ्यावर  का  असेना.....