लहानपणी जेंव्हा आम्ही सुट्टीला
गावाला जायचो,
वाटेने अखंड वाहणारी
"भीमा" आम्ही पाहायचो....
आई-बाबा पटकन
चार आणे काढून
द्यायचे,
आणि बस मधून
आम्ही ते नदीत
टाकायचो....
नदीत पैसे का
टाकतात हे त्या
चिमुकल्या हातांना कळायचे नाही,
आणि आता तर
, नदीत पैसे टाकतात
हेच आठवणीत नाही....
परत-परत तोच
प्रश्न मनात घोळतोय,
खरच का टाकतात
नदीत पैसे....?
नदी म्हणजे जीवन...
दुसऱ्यांसाठी
वाहणारे....
अडथळे पार करत
जाणारे....
न थांबणारे, न दमणारे...
नि:स्वार्थीपणे सर्वस्व गमावणारे....
आणि शेवटी सागरात सामावणारे....
याची जाणीव म्हणून
तर टाकत नसतील
नदीत पैसे...?
आज धावत्या काळाबर आम्ही
हे सारे विसरलोय,
कदाचित “कृतज्ञता” नावाची आमची
नदीच आटलीय,
"पवना"
ओलांडताना हीच भावना
मनात दाटलीय......
No comments:
Post a Comment