घरी भावंडांमध्ये जर तुम्ही सगळ्यात मोठे असाल, तर नक्कीच तुमचीही लहानपणी माझ्यासारखीच फजिती होत असणार...
माझ्या घरात सगळ्या भावंडांमध्ये मी मोठा... बऱ्याच वेळा माझा लहान भाऊ आणि बहिण खोड्या करायचे आणि मार मला खावा लागायचा... तसं मी स्वतःच्या खोड्यांमुळे पण भरपूर मार खायचो... tongue emoticon पण कधी- कधी माझी चूक नसतानाही मला मार खावा लागायचा... तक्रार आई-बाबांपर्यंत गेली कि हे दोघे एक व्हायचे आणि मला एकट्याला खिंडीत गाठायचे. त्यामुळे घरचे पण त्यांच्यावरच विश्वास ठेवायचे आणि वरून मलाच बोलायचे, ' ते दोघे लहान आहेत. तू मोठा घोडा आहेस तुला कळत नाही का?'
साला, आता खोड्या करायला पण वेळ नाही आणि घरचे पण मारत नाहीत... मजा नाही येत...!!!
No comments:
Post a Comment