Wednesday 13 November 2013

स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

सोडून गेलीस तेंव्हा विचार केला नाहीस,
आणि आता हळूच जखमेवर फुंकर घालतेस....
स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

तुझ्या आठवणी जाळण्याचा प्रयत्न मी करतोय,
आणि तू काळाच्या खिडकीतून डोकावतेस....
स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

वेड्यासारखा रानो-रानी उन्हा- तान्हात भटकतोय,
आणि तू ढग होऊन माझ्यावर सावली धरतेस.....
स्वप्नात येऊन माझ्या, तू मला अशी का छळतेस?

राहू शकत नाहीस माझ्या विना,
विसरू शकत नाहीस मला,
तर दूर गेलीसच कशाला?
दूर जाऊन जगण्याचा केविलवाणा प्रयत्न का करतेस?